यवतमाळ - शेतात जाण्यासाठी पक्का पाणंद रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना चिखल तुडवत आणि पाण्यातून मार्ग काढत शेतात जावे लागते. झरीजामणीतालुक्यातील अडेगाव येथील शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
चिखल तुडवत गुडघाभर पाण्यातून काढावा लागतो शेताचा मार्ग; अडेगावमधील शेतकऱ्यांची व्यथा - अडेगाव पाणंद रस्ता न्यूज
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अडेगाव येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. याबाबत अडेगाव येथील अनेक महिलांनी झरीजामणीच्या तहसीलदारांना निवेदन दिले. रस्त्याची मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणचा करण्याचा इशारा अडेगावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

अडेगाव शेतकरी
चिखल तुडवत काढावा लागतो शेताचा मार्ग
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. शेतात बैलगाडी जात नसल्याने शेतातील पिकाला खताचा पुरवठा होत नाही. मजूर देखील शेतात येण्यासाठी दुप्पट मजूरी मागत आहेत. खोदून ठेवलेल्या पाणंद रस्त्याला नाल्याचे रूप आले आहे. शेतकऱ्यांना या रस्त्यातेनेच ये-जा करावी लागते. याबाबत अडेगाव येथील अनेक महिलांनी झरीजामणीच्या तहसीलदारांना निवेदन दिले. रस्त्याची मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणचा करण्याचा इशारा अडेगावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.