महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 10, 2020, 1:58 PM IST

Updated : May 10, 2020, 3:29 PM IST

ETV Bharat / state

सीसीआयच्या धोरणाविरोधात शेतकऱ्याने जाळला कापूस; मारेगाव बाजार समितीतील घटना

तालुक्यातील कुंभा परिसरातील टाकळी येथील अरुण आदेवार व महेंद्र पांगळे यां शेतकऱ्यांनी नियोजित वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये विक्रीकरता कापूस आणला होता. मात्र, येथे सीसीआयने हेकेखोर प्रवृत्तीने शेतकऱ्यांचा कापूस घेण्यात स्पष्ट नकार दिला. त्यामुळे एका शेतकऱ्याने १० ते १५ किलो कापूस बाजार समितीच्या प्रांगणातच जाळून सीसीआयविरोधात संताप व्यक्त केला.

सीसीआयच्या धोरणाविरोधात शेतकऱ्याने जाळला कापूस
सीसीआयच्या धोरणाविरोधात शेतकऱ्याने जाळला कापूस

यवतमाळ - येथे कापूस खरेदी केला जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यातच सीसीआयच्या धोरणाविरोधात शेतकऱ्याने मारेगाव बाजार समितीतील कापूस जाळल्याची घटना घडली आहे.

सीसीआयच्या धोरणाविरोधात शेतकऱ्याने जाळला कापूस

तालुक्यातील टाकळी कुंभा येथील शेतकऱ्यांच्या पांढर्‍या सोन्याला समाधानकारक भाव न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात दहा ते पंधरा किलो कापूस पेटवण्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारेगाव तालुक्यात गत दीड महिन्यापासून कापूस खरेदीला ब्रेक लागल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या घरी हजारो क्विंटल कापूस घरात पडून आहे. कोरोनाच्या सावटाखाली मागील दीड महिन्यापासून सीसीआयची कापूस खरेदी रखडलेली होती. शेतकऱ्यांच्या एल्गाराने कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑफलाईन नाव-नोंदणी मागील आठवड्यात सुरू करण्यात आली. दरम्यान एक हजार आठशे शेतकऱ्यांची नावे नोंद करण्यात आल्यानंतर क्रमवारी प्रमाणे शेतकऱ्यांना बोलाविण्यात येत आहे.

तालुक्यातील कुंभा परिसरातील टाकळी येथील अरुण आदेवार व महेंद्र पांगळे यां शेतकऱ्यांनी नियोजित वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये विक्रीकरता कापूस आणला होता. मात्र, येथे सीसीआयने हेकेखोर प्रवृत्तीने शेतकऱ्यांचा कापूस घेण्यात स्पष्ट नकार दिला. शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांनी कापूस घेण्यास नकारच दर्शवला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले दहा-पंधरा किलो पांढरे सोने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातच जाळून संताप व्यक्त केला. यावेळी बाजार समितीमार्फत पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनास तत्काळ पाचारण करण्यात आले होते.

Last Updated : May 10, 2020, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details