यवतमाळ -जिल्ह्यातील दिग्रस येथे कापूस विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी खरेदीस उशीर होत असल्याने संतापून चक्काजाम आंदोलन केले. प्रशासनाने शेतकऱ्यांची समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, तोपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला होता. पण खरेदीचा वेग हा अत्यंत कमी होता. त्यामुळे शेतकरी आपले हातातले काम सोडून तब्बल ८ दिवसांपासून कापूस खरेदी होईल या आशेवर बसले होते. परंतु, प्रशासनामार्फत कोणतीही सुनावणी न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतारून ३ तास चक्काजाम केला. यामुळे मुख्य चौकात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.