यवतमाळ- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उमरखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन; उमरखेड तहसील कार्यालयासमोर निदर्शने
पीक विम्याची मुदत वाढविण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, यांसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये पीक विम्याची मुदत वाढविण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, यांसह इतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांना देण्यात आले. या आंदोलनादरम्यान मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. परंतु संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजाराचा दिवस लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली. त्यामुळे मोर्चा रद्द करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.