यवतमाळ - शासनाने आणेवारीचा खेळ बंद केला पाहिजे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यवतमाळच्या वणी तालुक्यातील निळापूर गावात फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही वाचा -अखेर एअर इंडियाचा लिलाव, टाटा ग्रुप बनला नवा मालक
- फडणवीसांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी -
सद्या पूरस्थिती व अतिवृष्टी म्हणून आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. मात्र, या सरकारच्या काळात पीकविमा व इतर मदतही शेतकऱ्यांना मिळत नाही. ही विशेष परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष मदत केली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करून भरघोस मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. मागील दोन वर्षापासून शेतकरी सतत संकटात आहेत. त्यामुळे यावर्षी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब तर कापसाचे बोंड काळे पडत आहेत.
पावसामुळे हजारो हेक्टरमधील सोयाबीन, कापूस यासारखी हाती आलेली पिके नाहीशी झाली. त्यात प्रत्येक शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले. शेतात पुराचे पाणी शिरल्याने कापूस पिकाला फटका बसला आहे. पीक परिस्थिती सुरुवातीला चांगली होती. राज्य सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना विशेष मदत दिली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फडणवीस यांनी पिकांची पाहणी केली.
हेही वाचा -अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा समन्स; 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश