महाराष्ट्र

maharashtra

कृषी अ‌ॅप: एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती

By

Published : Feb 3, 2021, 12:10 PM IST

Updated : Feb 3, 2021, 4:27 PM IST

शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी, बियाणे खरेदी, शेती अवजार पुरवठा या माध्यमातून करता येणार आहे. या कृषी ॲपमध्ये शेतकरी आपली माहिती भरून मालाची विक्री करू शकतात. तर व्यापारी ॲपच्या माध्यमातून माल खरेदी करू शकतात.

कृषी अ‌ॅप: एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती
कृषी अ‌ॅप: एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती

यवतमाळ - आज विज्ञानाने मोठी प्रगती साधली असली तरी याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत फार कमी प्रमाणात पोहचल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळते. शेतकऱ्यांना मशागत, लागवडीपासून मालाच्या विक्रीपर्यंत सर्व माहिती एकाच क्लिकवर मिळावी यासाठी दारव्हा तालुक्यातील बोरिअरब येथील गौरव तिवारी याने कृषी ॲप विकसित केले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्‍यातील जवळपास दहा हजारावर शेतकर्‍यांनी या अ‌ॅपचा फायदा घेतला आहे. यातून शेतकरी आणि व्यापारी यांच्यात असलेल्या दलालांलापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. विशेष म्हणजे द्रीयमंत्री नितीन गडकरी या कृषी ॲप निर्मितीबद्दल गौरवचे कौतुकही केले आहे.

एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती


शेतकऱ्यांची लूट थांबेल

शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी, बियाणे खरेदी, शेती अवजार पुरवठा या माध्यमातून करता येणार आहे. या कृषी ॲपमध्ये शेतकरी आपली माहिती भरून मालाची विक्री करू शकतात. तर व्यापारी ॲपच्या माध्यमातून माल खरेदी करू शकतात. यामुळे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फायदेशीर असलेल्या या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबू शकेल. ग्रामीण भागात असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठेत असलेले भाव शेतकऱ्यांना घरबसल्या माहिती मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारणसुद्धा या अ‌ॅपच्या माध्यमातून केले जात आहे.

कृषी अ‌ॅप: एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती
परिसरातील इतर सेवा तातडीनेया ॲपमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्या शेतकऱ्यासांठी परिसरातील ट्रॅक्टर, हार्वेस्टर, कृषी केंद्र, व्यापारी यांची नावे नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने एखादी कृषी अवजारांची गरज भासल्यास केवळ त्यांच्या नावावर क्लिक केल्याबरोबर ही सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे.
Last Updated : Feb 3, 2021, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details