यवतमाळ - राळेगावपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कटाळून गळफास घेऊन जीवन संपवले. चिमा बारसू शिंदे (वय 50), असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
यवतमाळमधील गुजरी येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - पोलिस
मृत शेतकरी चिमा शिंदे यांच्यावर बँकचे 4 लाख तर खासगी सावकाराचे अंदाजे 2 लाख कर्ज होते.
मयत शेतकरी चिमा शिंदे
मृत शेतकरी चिमा शिंदे यांच्यावर बँकचे 4 लाख तर खासगी सावकाराचे अंदाजे 2 लाख कर्ज होते. शिंदे यांच्याकडे 5 एकर कोरड वाहू शेती आहे. परंतु, सततच्या नापिकी व कर्जामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मृत शिंदे यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून घटनेचा तपास राळेगाव पोलीस करीत आहे.