यवतमाळ - एकीकडे सरकार संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी वर्गाला कर्जमाफी झाली म्हणून सांगत फिरत आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यात याचे चित्र वेगळे आहे. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाठोडा येथील शेतकरी चंदन बीबीशन कांबळे (45 वर्षे) यांनी कर्जमाफी न मिळाल्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कर्जमाफी न मिळाल्याने यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाठोडा येथील शेतकरी चंदन बीबीशन कांबळे (45 वर्षे) यांनी कर्जमाफी न मिळाल्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आत्महत्या
हेही वाचा - मंदी येत नाही लादली जातेय अन ही अशांततेची सुरवात -प्रकाश आंबेडकर
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याजवळ 3 एकर कोरडवाहू शेती आहे. कुटुंबाचा गाडा शेतीवरच चालत होता. अंगावर असलेले कर्ज माफ न झाल्याने या शेतकऱयाने आपले जीवन संपवले आहे. घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.