यवतमाळ - विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उमरखेड येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजारचा दिवस लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलकांनी मोर्चा रद्द करुन तहसीलसमोर धरणे आंदोलन केले.
यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन - मागण्या
विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उमरखेड येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजारचा दिवस लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती.
यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. पीक विमा मुदत वाढविन्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.