नाशिक -शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली तसेच शेतीचा लिलाव थांबला पाहिजे यासाठी सोमवारी एनडीसीसी बँक नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली थांबवण्याची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या - स्वाभिमानी शेतकरी संघटना
दुष्काळामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून, गरज पाहून त्यांना या जाचक कर्जापासून मुक्त करुन आधार देण्यात यावा. तसेच सक्तीची कर्जवसुली ही मोहीम तात्काळ थांबावी या मागणीसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीसीसी बँक नाशिक येथे ठिय्या आंदोलन केले.
यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली असता सध्या एनडीसीसी बँकेने सक्तीची कर्ज वसुली चालवली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त करणारी ही प्रक्रिया तत्काळ थांबली पाहिजे. शेतकरी दुष्काळामुळे व शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणांमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. नाशिक जिल्ह्यात कर्जामुळे चार ते पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असुन सध्या शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे.
शेतकऱ्यांची गरज पाहून त्यांना या जाचक कर्जापासून मुक्त करुन आधार देण्यात यावा. तसेच सक्तीची कर्जवसुली ही मोहीम तत्काळ थांबावी या मागणीसाठी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेपुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.