यवतमाळ - अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील धरमगोटा येथे ही घटना घडली. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी - पांढरकवडा अस्वल हल्ला न्यूज
पांढरकवडा तालुक्यातील धरमगोटा येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. पोचिराम टेकाम असे या शेतकऱ्यांचे नाव आहे.
शेतकरी गंभीर जखमी
हेही वाचा - कापूस ओला झाला अन् तुरीचा बहर गळून गेला...
धरमगोटा गावातील शेतकरी पोचिराम टेकाम हे शेताच्या बांधावर काम करत असताना त्यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अस्वलाला पिटाळून लावले. गंभीर जखमी झालेल्या पोचिराम टेकाम यांना प्राथमिक उपचारासाठी पांढरकवडा रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना आदिलाबाद येथे पाठवण्यात आले.