यवतमाळ -जिल्ह्यातील आर्णी तालूक्यातील लोणी येथील शेतकरी अनंत बूट्टेकर यांनी भंगार, टाकावू वस्तूपासून ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारे यंत्र बनवले आहे. हे यंत्र आठ दिवसाचे काम एकाच दिवशी पूर्ण करते. या यंत्राव्दारे एकाच वेळी पाच कामे होत असल्याने शेतकर्यांनी अनोखा प्रयोग करुन वेळ पैसा आणि मंजूराची मोठया प्रमाणात बचत केली आहे.
यंत्र एक, कामे पाच; आर्णी तालुक्यातील शेतकऱ्याचा अनोखा अविष्कार भंगारातून आणले सर्व साहित्य -
अनंत बूट्टेकर यांनी कुठल्याही दुकानातून नवीन असे यंत्राचे पार्ट विकत आणले नसून सर्व भंगार, टाकावु वस्तुपासुन बनविलेले हे यंत्र एकाच वेळी पाच कामे करते. त्यांच्या तीन एकर क्षेत्रावर टरबुज फळांची लागवड करताना बेड करणे, बेडवर शेणखत टाकणे, रासायनिक खते टाकणे, ठिबक सिंचन संच टाकणे, नंतर बेडवर मल्चिंग टाकणे ही कामे अगदी सुलभ पद्धतीने केली जात आहे.
किमान 30 हजाराची बचत -
16 एकर शेती असून तीन एकर क्षेत्र सिंचनाखाली आहे. शेतीत काम मजुरांकडून केले जात होती. त्याला आठ दिवस लागत होते. भंगार वस्तू पासून यंत्र तयार करण्यात आले. त्यासाठी कोणतेही नवीन सुटे भाग वापरण्यात आले नाहीत. भंगारात असलेल्या वस्तूचा वापर करण्यात आला. आठ दिवसांत होणारे काम या यंत्रामुळे एका दिवसात होत असल्याने जवळपास 30 हजार रुपये आणि वेळेची बचत होऊ लागली आहे.