यवतमाळ - काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिपरिप सुरू केली आहे. सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. या हंगामातील हा पहिलाच संततधार पाऊस आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस हजेरी लावत आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम, शेतकरी सुखावला - yavatmal rain updated news
जून महिन्यात आलेल्या पावसामुळे खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर पिकांच्या पेरण्या वेळेवर आटोपल्या. मात्र, श्रावण महिन्यात कोसळत असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु, शेतीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने नदी, नाले भरून वाहत आहे.
मागील दोन दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. कुठे रिपरिप तर कुठे धोधो असा पावसाचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे वातावरणात आणखी गारवा वाढला आहे.
सुरुवातीला जू जून महिन्यात आलेल्या पावसामुळे खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर पिकांच्या पेरण्या वेळेवर आटोपल्या. मात्र, श्रावण महिन्यात कोसळत असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु, शेतीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने नदी, नाले भरून वाहत आहेत. तर प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत आहे. श्रावण महिन्यात पाऊस पडत असल्याने नागरिक या पावसाचा आनंद लूटत आहेत.