यवतमाळ -जिल्ह्यातील वेडद येथील शेतकरी दिलीप गाळगे(52) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. शेतात मुगाची गंजी झाकण्यासाठी गेले होते.
सायंकाळच्या सुमारास पाऊसाची चाहूल लागताच मृतक दिलीप गाळगे यांनी मूग भिजू नये म्हणून त्यावर गोणी झाकायला गेले होते. तर त्यांचा मित्र सतीश हे सोयाबीन झाकत होते. मात्र त्याच वेळी अचानक दिलीप यांच्या अंगावर वीज पडली. ही घटना झाल्याचे सतीश यांना माहितीच नव्हती. सोयाबीन झाकल्यावर सतीश हे दिलीप यांच्याजवळ गेले असता त्यांना दिलीप खाली पडलेले दिसले व त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती शेजारी व गावकऱ्यांना दिली.