यवतमाळ - जिल्ह्यातील जांब येथील रामसिंग जग्गुजी जाधव (वय ७०) या शेतकऱ्याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
कर्जमाफीच्या यादीत नाव नाही; निराशेने यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या - शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जमाफीत त्यांचे नाव आले नसल्यामुळे अनेक दिवसांपासून ते बॅंकेत चकरा मारत होते. दुबार पेरणी नंतरही चांगल्या पिकाची त्यांना खात्री नसल्याच्या चिंतेने त्यांनी आत्महत्या केली.
![कर्जमाफीच्या यादीत नाव नाही; निराशेने यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4117975-thumbnail-3x2-yavatmal.jpg)
आत्महत्या
शेतकरी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत, अशीच एक घटना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी घडली. रामसिंग यांच्याकडे ४ एकर शेती असून त्यांच्यावर सेंट्रल बॅंकेचे ९० हजाराचे कर्ज होते. गेल्या काही दिवसांपासून ते उद्वीग्न होते. कर्जमाफीत त्यांचे नाव आले नसल्यामुळे अनेक दिवसांपासून ते बॅंकेत चकरा मारत होते. दुबार पेरणी नंतरही चांगल्या पिकाची त्यांना खात्री नसल्याच्या चिंतेने त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.