महाराष्ट्र

maharashtra

यवतमाळमध्ये ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

By

Published : Dec 13, 2019, 2:46 PM IST

यावर्षी दत्तूजी कोल्हे यांनी शेतीसाठी बँकेचे कर्ज तसेच खासगी सावकाराकडून कर्ज काढले होते. मात्र, ओल्या दुष्काळामुळे पिकाला मोठा फटका बसला. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची अशा चिंतेत ते होते.

farmer-committed-suicide-in-yavtmal
यवतमाळमध्ये ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ- येथील राळेगाव तालुक्यातील शेळी येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नापिकी, कर्जबाजारी यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. दत्तूजी शंकरराव कोल्हे, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा-एकदम कडक..! पन्हाळा गडावरील 'झुणका भाकर' पुन्हा तेजीत

यावर्षी दत्तूजी कोल्हे यांनी शेतीसाठी बँकेचे कर्ज तसेच खासगी सावकाराकडून कर्ज काढले होते. मात्र, ओल्या दुष्काळामुळे पिकाला मोठा फटका बसला. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची अशा विचारात ते होते. शेवटी त्यांनी विष घेत आत्महत्या केली. त्यांच्याकडे आठ एकर शेती आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि त्यांचे दोन मुले असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details