यवतमाळ - अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस, कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - अवकाळी पावसामुळे शेतकरी आत्महत्या यवतमाळ बातमी
भांबोरा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदा राठोड (वय ५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा-आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर
अतिवृष्टी, नापिकी, कर्ज आणि शेतामधील जंगली प्राण्यांमुळे शेत मालाच्या होणाऱ्या नासाडीला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवित आहेत. भांबोरा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदा राठोड (वय ५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राठोड या शेतकऱ्याकडे पाच एकर शेती आहे. अवकाळी पावसामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगीतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.