सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्याव - स्वाभिमानी शेतकरी संघटना - yavatmal farmer news
राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी विविध कागदपत्रे मागून लॉकडाउन काळात नाहक त्रास देत आहे. अनेक शेतकऱ्यांना आल्यापावली बँकेतून परत जावे लागत आहे. बँकेकडून वेळेवर पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे कोविडच्या पाश्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत खरीप हंगामाची चिंता; आर्थिक पॅकेज देण्याची मागणी
यवतमाळ -सध्या कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. कोरोना काळाचा फटकाही त्यांना सहन करावा लागला. गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आता खरीप हंगामात शेतकरी शेतात राबत आहेत.मात्र, पीककर्ज वेळेवर मिळत नसल्याने बियाणे, खते खरेदीसाठी पैसा कुठून आणायचा ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.