महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फटका, खाण्या-पिण्याचे झाले वांदे - यवतमाळ संचारबंदी न्यूज

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 337 पदांसाठी आज विविध यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली. त्याअनुषंगाने शनिवारी सायंकाळपासूनच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शहरात दाखल झाले. परंतु जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा फटका या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.

Examiner students on yavatmal curfew
संचारबंदीचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फटका, खाण्या-पिण्याचे झाले वांदे

By

Published : Feb 28, 2021, 8:12 PM IST

यवतमाळ - आरोग्य विभागाच्या 54 संवर्गासाठी आज यवतमाळसह विविध जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. यानिमित्त यवतमाळ शहरात हजारो विद्यार्थी दाखल झाले. परंतु संचारबंदीमुळे संपूर्ण बाजारपेठेसह अंतर्गत वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. अनेक परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा देखील उडाला.

प्रतिक्रिया देताना परीक्षार्थी...
खाण्या-पिण्याचे झाले वांधे
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 337 पदांसाठी आज विविध यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली. त्याअनुषंगाने शनिवारी सायंकाळपासूनच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शहरात दाखल झाले. परंतु जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा फटका या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. शहरातील खाण्यापिण्याची सर्व दुकाने बंद बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशीपोटी परीक्षा केंद्रावर जावे लागले.

ABOUT THE AUTHOR

...view details