भाच्याने केला सेवानिवृत्त नायब तहसीलदार मामाचा खून - मामाचा खून केल्याप्रकरणी मामा जेरबंद
सेवानिवृत्त झालेल्या पेंदोरकर यांचाा मृतदेह शुक्रवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास फुलसावंगी रस्त्यावरील पिंपळगाव ते महागाव रस्त्या दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. मात्र, हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून वर्तीवली होती. परंतु पेंदोरकर यांच्या मृतदेहाजवळ कोणतेही वाहन आढळून आलेले नाही. त्यामुळे शंकेला पेव फुटले आणि खून असल्याचा संशय व्यक्त केला गेला

यवतमाळ - पूर्ववैमनस्याच्या वादातून भाच्याने सेवानिवृत्त झालेल्या नायब तहसीलदार मामाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आली आहे. मोहन पेंदोरकर असे मृतक सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांचे नाव आहे. तर पवन श्रीराम मंगाम (रा. विश्वशांती नगर, यवतमाळ) असे माथेफिरू मारेकरी भाच्याचे नाव आहे. आरोपीला यवतमाळ पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिफातीने यवतमाळ येथील लोहारा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पूर्ववैमनस्याच्या वादातून खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
आरोपीला तातडीने अटक
पेंदोरकर हे महागाव तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेसाठी नायब तहसीलदार म्हणून काम करत होते. सेवानिवृत्त झालेल्या पेंदोरकर यांचाा मृतदेह शुक्रवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास फुलसावंगी रस्त्यावरील पिंपळगाव ते महागाव रस्त्या दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. मात्र, हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून वर्तीवली होती. परंतु पेंदोरकर यांच्या मृतदेहाजवळ कोणतेही वाहन आढळून आलेले नाही. त्यामुळे शंकेला पेव फुटले आणि खून असल्याचा संशय व्यक्त केला गेला. मृतदेह सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत मृतकाच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आल्याने डॉक्टरांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने आरोपीला यवतमाळ येथील लोहारा परिसरातून अवघ्या काही तासातच तासात बेड्या ठोकण्यात आल्या.
दोन दिवसांपूर्वी भेटला मामाला
दोन दिवसापूर्वी मामाच्या भेटीसाठी तो महागाव येथे आला होता. मृतकाने चारचाकी वाहन ( एमएच २० सीएच ०८४०) घेतल्याने भाचा मामाला गाडी शिकवण्यासाठी फुलसावंगी रोडवर घेवून गेला. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी पवनने पूर्ववैमनस्याच्या वादातून मामाच्या पोटात कैचीने सपासप वार केले आणि तेथून चारचाकीसह यवतमाळच्या दिशेने पळ काढला होता, याची आरोपीने पोलिसांसमोर कबुली दिली आहे. मृतकाची पत्नी चंदाबाई मोहन पेंदोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला, असून खुनात वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास चव्हाण करीत आहे.