महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिबला परिसरातील जीवाष्मांचे शासनाने संवर्धन करावे - प्रा. चोपणे

या स्थळाचे भौगोलिक महत्त्व वाढले असून हे स्थळ अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. या दृष्टीकोनातून या स्थळाचे संरक्षण होणे अत्यावश्यक असल्याचे भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

Environmental practitioners yavatmal
Environmental practitioners yavatmal

By

Published : Jul 13, 2021, 9:13 PM IST

यवतमाळ - झरी तालुक्यातील शिबलाजवळ कोलमणार बेसाल्ट आढळले असतानाच याच परिसरात शंख-शिंपल्याची आणि वनस्पतीची जीवाष्मे आढळली आहेत. त्यामुळे या स्थळाचे भौगोलिक महत्त्व वाढले असून हे स्थळ अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. या दृष्टीकोनातून या स्थळाचे संरक्षण होणे अत्यावश्यक असल्याचे भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

परिसरात जीवाष्मे

जिल्ह्यातील झरी तालुक्यात कोलमणार बेसाल्ट आढळल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. परंतु आता त्याच परिसरात सर्वेक्षण करताना 6 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या नद्या आणि गोड्या पाण्यातील शंख-शिंपल्यांची (Gastropods, Bevalves) आणि वनस्पतींची जीवाष्मे (plant fossils) पर्यावरण अभ्यासक प्रा. चोपणे यांना आढळली आहे. यापूर्वीही काही भूशास्त्र अभ्यासकांनी येथील जिवाष्माची नोंद केली आहे. कोलमणार बेसाल्ट हा लाव्हारस पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे थंड होऊन पंच-शटकोनीय खांब तयार झाले, असे प्रा. चोपणे यांनी म्हटले होते. ते या पुराव्यामुळे खरे ठरले आहे. परिसरात जीवाष्मे असल्याने त्या दाव्याला बळ मिळाले आहे.

लाव्हारसाच्या पुरामुळे जीवन नष्ट

चंद्रपूर, यवतमाळ जिल्हा हा जलचर जीव, वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवाष्मासाठी प्रसिद्ध आहे. चोपणे यांनी यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, सुसरी, कळंब आणि मारेगाव तालुक्यात शंख शिंपळ्यांची जीवाष्मे शोधून काढली आहेत. विदर्भ परिसरात आजच्यासारखाच पाणीसाठा तेव्हासुद्धा मुबलक प्रमाणात होता आणि भरपूर प्राणी जीवनही होते. मात्र 6 कोटी वर्षादरम्यान आलेल्या लाव्हारसाच्या पुरामुळे ते जीवन नष्ट झाले आणि आज ते जिवाश्मांच्या रूपाने आपल्या समोर आहे. येथे गोड्या पाण्यातील शंख-शिंपले आणि वनस्पतीची जीवाष्मे आढळतात. भविष्यात संशोधनाच्या आणि संवर्धनाच्या दृष्टीने हे स्थळ महत्त्वाचे आहे. म्हणून येथील कोलमणार बेसाल्ट आणि परिसरातील जिवाष्माचे जतन होणे आवश्यक आहे. प्रा. सुरेश चोपणे याांनी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना पत्र लिहून या परिसराचे संवर्धन करण्याची विनंती केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details