महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी कर्मचार्‍यांचे बेमुदत कामबंद आंदोलन - माहिती अधिकाऱ्याकडून कृषी कर्मचाऱ्यांना मारहाण

सुरेश राजगुरे याने कार्यालयातील अनुरेखक वीरेंद्र भोयर यांना मारहाण केली. तसेच साहायक प्रशासक अधिकारी यांच्याशी उद्धटपणे बोलून हुज्जत घातली. सुरेशा राजगुरे हा माहिती अधिकारांचे अर्ज करून स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर करतात.

कृषी कर्मचार्‍यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
कृषी कर्मचार्‍यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

By

Published : Feb 3, 2021, 3:36 AM IST

Updated : Feb 3, 2021, 5:45 AM IST

यवतमाळ - कृषी कार्यालयातील कर्मचार्‍यास एका आरटीआय कार्यकर्त्याने मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच महिला अधिकार्‍यांशी एकेरी भाषेत हुज्जत घातली. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी दहशतीत आहेत. कृषी विभागात अशा पद्धतीने वागणार्‍या तसेच सतत तक्रारी करणार्‍या सुरेशा राजगुरे याच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कृषी कर्मचार्‍यांनी जिल्ह्यात कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

कृषी कर्मचार्‍यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
कठोर शिक्षेची मागणीअमरावती विभागीय कृषी कार्यालयात सुरेश राजगुरे याने कार्यालयातील अनुरेखक वीरेंद्र भोयर यांना मारहाण केली. तसेच साहायक प्रशासक अधिकारी यांच्याशी उद्धटपणे बोलून हुज्जत घातली. सुरेशा राजगुरे हा माहिती अधिकारांचे अर्ज करून स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर करतात. तक्रारी करून पैशाची मागणी करीत असल्याचा आरोपही यावेळी कर्मचारी यांच्याकडून करण्यात आला.
कृषी कर्मचार्‍यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

राजगुरे शासनाच्या विविध विभागांकडे तक्रारी तसेच माहिती अधिकारांतर्गत केलेल्या अर्जांची संख्या असंख्य आहे. त्यामुळे राजगुरेच्या अर्जांची दखल घेण्यात येऊ नये, कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात कृषी अधिकारी, संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, ट्रेसर्स असोसिएशन, कृषी साहायक संघटना, राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी आदींनी पाठिंबा दिला आहे.

Last Updated : Feb 3, 2021, 5:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details