यवतमाळ - रुग्णालयात उपचाराला येत असलेले अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत आहे. त्यांचे अंत्यसंस्कार हे यवतमाळ नगरपालिका करत आहे. मे 2020 ते आजपर्यंत एकूण 1 हजार 222 कोरोना मृतकांवर नगर पालिकेने अंत्यसंस्कार केले आहेत. हे अंतिम संस्कार करणाऱ्या सर्व कोरोना योध्यांची दखल माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांना घेतली असून त्यांचा या कार्याचा सत्कार करण्यात आला.
मोक्षधाममध्ये कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप - संजय राठोड
मे 2020 ते आज पर्यंत एकूण 1 हजार 222 कोरोना मृतकांवर नगर पालिकेने अंत्यसंस्कार केले आहेत. हे अंतिम संस्कार करणाऱ्या सर्व कोरोना योध्यांची दखल माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांना घेतली असून त्यांचा या कार्याचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येक धर्माचे रूढी, परंपरेनुसारे अंतिम संस्कार
नगर पालिकेचे डॉ. विजय अग्रवाल, नगर पालिका कार्यालय अधीक्षक अजयसिंह गहरवाल, कनिष्ठ लिपिक अमोल पाटील, कनिष्ठ लिपिक भूषण कोटंबे, कंत्राटी कर्मचारी अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार, शेख अहमद शेख गुलाम, शेख अलिम शेख इकबाल, आरिफ खान बशीर खान व केशव गायकवाड यांच्या या निरपेक्ष व अमूल्य कार्याचे कौतुक शाल, श्रीफळ, पुष्पहार, कौतुक पत्र व भेटवस्तू देऊन माजीमंत्री आमदार संजय यांचे हस्ते करण्यात आले. "अंतिम संस्कार करतांना प्रत्येक धर्माचे रूढी व परंपरे अनुसारे आम्ही अंतिम संस्कार करतो. या कार्यात गेल्या वर्षात अनेक सामाजिक संघटनांनी आम्हाला मदत केली. पार्थिव देहाचे पावित्र्य कायम ठेवून मृतकाच्या आप्तेष्ठांना आम्ही अंतिम संस्कार स्थळी बोलावतो. दुसऱ्या दिवशी मृतकाची रक्षा व अस्थी सुद्धा आम्ही नातेवाईकांना सुपूर्द करतो" असे या कार्यात वाहून घेतलेल्या डॉ. विजय अग्रवाल यांनी सांगितले.