महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ पोलीस दलात अकरा महिला वाहन चालक म्हणून होणार रुजू - Yawtmal latest news

पोलीस विभागात कार्यरत आणि इच्छुक महिलांनी वाहन चालक होण्याची संधी विभागातील महिलांना उपलब्ध झाली. त्याद्वारे 11 महिला वाहन चालक पदासाठी विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई यांनी आम्हाला वाहन चालक व्हायचे आणि काही तरी वेगळे करायचे हे आव्हान त्यांनी स्वीकारले

पोलीस दलात अकरा महिला पोलीस वाहन चालक म्हणून होणार रुजू
पोलीस दलात अकरा महिला पोलीस वाहन चालक म्हणून होणार रुजू

By

Published : Aug 15, 2020, 1:22 PM IST

यवतमाळ - जिल्हा पोलीस दलातील 11 महिला आता वाहन चालक म्हणून जिल्हा पोलीस दलात मोटार परिवहन विभागात लवकरच रुजू होणार आहेत. या 11 महिलांच ट्रेनिंग आता पूर्ण होत असून या महिला पोलीस दलाची महत्वपूर्ण जबाबदारी लवकरच सांभाळताना दिसणार आहेत.

आतापर्यंत या विभागात पुरुषच वाहन चालक म्हणून असायचे. आता या महिला चालक झाल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा आनंदी आहेत. या महिला पोलिसांना पहिल्यांदा स्टेरिंग सांभाळताना थोडी चिंता वाटली होती. "आपण वाहन चालवू शकणार का? असेही वाटले होते. मात्र, आता ट्रेनिंगनंतर भीती, चिंता दूर गेली असून आता अवजड आणि लाईट वेट असलेले वाहन या महिला सहजरित्या चालवित आहेत. त्यामुळे आता स्वतःचा अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया वाहन चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला पोलिसांनी दिली. वेगवेगळ्या भागातून या महिला पोलीस दलात दाखल झाल्या असून शेतकरी कुटुंबातील या महिला आणि मुली शिपाई म्हणून जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्या होत्या.

दरम्यान, पोलीस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विभागात अनेक महिला दाखल झाल्या आहेत. प्रत्येक भरती प्रक्रियेमध्ये पोलीस दलात नोकरी मिळावी म्हणून हजारो महिला यात सहभागी होतात. पोलीस दलातील पुरुषप्रमाणे महिलाना देखील कर्तव्य बजावावे लागते, असे असले तरी जिल्हा पोलीस दलात एकही महिला पोलीस वाहनांचे चालक म्हणून कार्यरत नाही.

दरम्यान पोलीस विभागात कार्यरत आणि इच्छुक महिलांनी वाहन चालक होण्याची संधी विभागातील महिलांना उपलब्ध झाली. त्याद्वारे 11 महिला वाहन चालक पदासाठी विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई यांनी आम्हाला वाहन चालक व्हायचे आणि काही तरी वेगळे करायचे हे आव्हान त्यांनी स्वीकारले. आणि यासाठी स्वखुशीने जिल्हा पोलीस मोटार परिवहन विभागात अर्ज सादर केला.

या सर्व महिलांचे पुणे जिल्ह्यात चालक प्रशिक्षण केंद्र येथे 45 दिवसांचे ट्रेनिंग पूर्ण झाले. त्यानंतर कोरोना संकटामुळे त्यासर्वाना बंदोबस्तसाठी पाठविण्यात आले होते. आता मात्र, या सर्व महिला मोटार परिवहन विभागात त्या रुजू होवून त्यांनी सराव सुरू केला आहे. लाईट हेवी वेट वाहन त्या सर्वजनी चालवितात. आता त्यांचे येथील ट्रेनिंग पूर्ण होत असून त्या लवकरच पोलीस दलातील वाहन चालक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत, असे मोटार परिवहन अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details