महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्राहकांकडून वीजबिलांची होळी; राज्य शासनाचा केला निषेध - light bill burnt by people in yavatmal news

महावितरणने कोरोना काळातील वीजबिलाची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. याच्या निषेधार्थ यवतमाळमधील ग्राहकांनी वीजबिलांची होळी केली.

वीजबिलांची होळी करताना
वीजबिलांची होळी करताना

By

Published : Nov 18, 2020, 6:08 PM IST

यवतमाळ - कोरोना काळातील थकीत वीजबिलांची वसुली करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. त्यामुळे सवलतीच्या आशेवर असलेल्या वीजग्राहकांना जोरदार शॉक लागला आहे. त्यामुळे वीजबिल ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासोमर वीजबिलांची होळी केली.

राज्य शासनाविरुद्ध घोषणाबाजी

कोरोना काळात वीजग्राहकांना आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलातून सवलत मिळण्याची आशा मावळली आहे. महावितरणने त्याबाबतचा परिपत्रकच जारी केले आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र वीजबिल ग्राहक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वीजबिलांची होळी करत राज्य सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी केली.

तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

यावेळी कोरोना काळातील वीजबिले सरसकट माफ करण्याची मागणीही करण्यात आली. सरसकट वीजबिल माफी देणे शक्य नसल्यास शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना वगळून बाकीच्यांना वीज माफी द्यावी, अशीही मागणी यावेळी केली. जर वीज बील माफ झाले नाहीतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी संघटनेकडून देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details