यवतमाळ- विजेचे दर निम्मे करणे तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात येणार असून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून आज वीज बिलांची होळी
वाढलेल्या वीज दरामुळे विदर्भीय जनतेची लूट होत आहे. शासनाकडून सामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे खिशे खाली करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भातील सर्व तालुकास्तरावरील वीज महामंडळाच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
वाढलेल्या वीज दरामुळे विदर्भीय जनतेची लूट होत आहे. शासनाकडून सामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे खिशे खाली करण्याचे काम सुरू आहे. या लूटमारीच्या विरोधात रस्त्यावर उतरून सर्व आमदार-खासदारांना व जनतेच्या प्रतिनिधींना जाब विचारला जाणार आहे. त्याचबरोबर वीज दरवाढी विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भातील सर्व तालुकास्तरावरील वीज महामंडळाच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. त्यांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असल्याचा मंत्र दिला होता. तर विदर्भ राज्य आंदोलन समितीने "विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, व तो मी मिळविणारच" ही घोषना करत आज आंदोलन सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.