यवतमाळ -निवडणूक काळात होणार्या दारू विक्रीवाढीची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. जिल्ह्यालगत असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत दारूबंदी आहे. निवडणूक काळात या जिल्ह्यांत होणार्या दारू तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रेत्यांना दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या काळात तळीरामांची पर्वणी असते. यावर प्रतिबंध लावण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवडणूक आयोगाने कडक सुचना दिल्या आहेत. मद्य व्यावसायिकांना त्यांच्याकडील साठा आणि विक्रीची माहिती दररोज ऑनलाईन कळवावी लागणार आहे. एका दिवसाच्या मद्य विक्रीमध्ये ३० टक्के वाढ झाली, तर त्या परवाना धारकाला कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे.
हेही वाचा - पक्षांतर करणाऱ्या भामट्यांना मत नाही तर 'लाथा' मारा - बच्चू कडू