महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये आज 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 7 जण कोरोनामुक्त - corona patients in yavatmal

जिल्ह्यात आज दिवसभरात 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, सात कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्याने आठ पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 51 वर पोहचली आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 33 जण भरती आहे.

दिवसभरात आठ पॉझेटिव्ह
दिवसभरात आठ पॉझेटिव्ह

By

Published : Jun 19, 2020, 9:18 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात आज(शुक्रवार) दिवसभरात 8 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यात 7 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले सातजण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आज नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दारव्हा येथील एकूण सात तर एकजण आर्णी येथील आहे. दारव्हा येथील रुग्णांमध्ये 67 वर्षीय पुरुष तसेच 25, 25, 34, 58, 40, 55 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तर आर्णी येथील 55 वर्षांच्या महिलेचाही समावेश आहे. दरम्यान, गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50 होती. यातील सात जणांना उपचाराअंती सुट्टी मिळाल्यामुळे ही संख्या 43 झाली होती. मात्र, आज नव्याने आठ पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 51 वर पोहचली आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 33 जण भरती आहे.

शुक्रवारी महाविद्यालयाने 51 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले आहेत. तर, सुरुवातीपासून आतापर्यंत 3 हजार 302 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 3 हजार 80 प्राप्त तर 219 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 214 वर पोहचली आहे. यापैकी 156 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे आठ रुग्णांच्या मृत्युची नोंद होती. मात्र, मूळचे अकोला येथील रहिवासी असलेले व यवतमाळ येथे मृत झालेल्या व्यक्तींची नोंद अकोला येथे झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा एकने कमी होऊन सातवर आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details