महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंता वाढली! यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू - यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे आठ मृत्यू

मागील चोवीस तासात यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने आठ जणांचा मृत्यू झाला

Eight deaths due to corona in Yavatmal district
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे आठ मृत्यू

By

Published : Mar 16, 2021, 7:18 PM IST

यवतमाळ - मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने आठ जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत एकाच दिवशी कोरोनाने इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असून जिल्हा प्रशासन नागरिकांच्या तपासणी युद्ध पातळीवर करीत आहे. मात्र दररोज साडेतीनशेवर पॉझिटिव्ह रुग्ण निघत असल्याने चिंता वाढली आहे.

मृतांमध्ये वयोवृद्धच जास्त-

आज मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 50 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 70 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय पुरुष आणि 80 वर्षीय महिला, राळेगाव येथील 86 वर्षीय महिला, माहूर (जि. नांदेड) येथील 55 व 65 वर्षीय महिला आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 63 वर्षीय महिला आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या 352 जणांमध्ये 239 पुरुष आणि 113 महिला आहेत. यात यवतमाळातील 131, पुसद 74, महागाव 43, दिग्रस 37, दारव्हा 14, उमरखेड 13, वणी 12, नेर 10, पांढरकवडा 7, झरीजामणी 6, घाटंजी 2, राळेगाव 2 आणि इतर ठिकाणचा 1 रुग्ण आहे.

मृत्युचा आकडा पोहचला 520-

आज प्रयोगशाळेतुन एकूण 5027 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 352 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 4675 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2994 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22454 झाली आहे. 24 तासात 204 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18940 आहे. तर कोरोनाने जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूचा आकडा हा 520 वर पोहचला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details