महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

18 ते 44 वयोगटासाठी जिल्ह्यात आठ केंद्रावर कोरोना लसीकरण, नाव नोंदणीचे आवाहन - Corona vaccine for 18 to 44 age group

जिल्ह्यात आता आठ केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस घेता येणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या केंद्रामध्ये उमरखेड, वणी आणि राळेगाव येथील केंद्राचा समावेश आहे. एकूण 2758 जणांनी लस घेतली

आठ केंद्रावर कोरोना लसीकरण, नाव नोंदणीचे आवाहन
आठ केंद्रावर कोरोना लसीकरण, नाव नोंदणीचे आवाहन

By

Published : May 8, 2021, 8:50 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील पाच केंद्रावर लसीकरणाची सोय उपलब्ध होती. यात नव्याने तीन केंद्राची भर पडली आहे. जिल्ह्यात आता आठ केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस घेता येणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या केंद्रामध्ये उमरखेड, वणी आणि राळेगाव येथील केंद्राचा समावेश आहे. एकूण 2758 जणांनी लस घेतली आहे.

लसीकरणासाठी नोंदणी करा

पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 290 जणांनी, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात 377 जण, पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 332 जण, लोहारा येथील केंद्रावर 373, पाटीपुरा येथील केंद्रावर 377, उमरखेड येथे 374, वणी येथे 310 आणि राळेगाव येथे 325 जणांनी लस घेतली. 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्वरीत नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात 628 बेड उपलब्ध

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहा डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 29 खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण 628 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 471 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 106 बेड शिल्लक, सहा डीसीएचसीमध्ये एकूण 360 बेडपैकी 178 रुग्णांसाठी उपयोगात, 182 बेड शिल्लक आणि 29 खासगी कोविड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 704 उपयोगात तर 340 बेड शिल्लक आहेत. तसेच जिल्ह्यातील 36 कोविड केअर सेंटरमध्ये 2913 बेडपैकी 1425 उपयोगात आणि 1488 बेड शिल्लक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details