यवतमाळ-जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 8 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तीन जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 63 झाली आहे.
गुरुवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 8 जणांमध्ये 6 पुरूष तर 2 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील दोन पुरूष, दारव्हा येथील दोन पुरूष, पुसद येथील दोन पुरूष, दिग्रस येथील एक महिला आणि आर्णी येथील एका महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 298 वर पोहोचली आहे. यापैकी तब्बल 226 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयासोलेशन वार्डात सद्यस्थितीत 85 जण भरती आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाने गुरूवारी 42 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत 5149 नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले असून यापैकी 4952 प्राप्त तर 197 अप्राप्त आहेत.