यवतमाळ - यंदाही कोरोना निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या मूर्तीची स्थापना करावी. हा संस्कार बाल मनावर पडावा आणि अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित व्हावे, या हेतूने उमरखेड नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वर संस्थान मध्ये आयोजित "चला बनवूया मातीचे गणराया" या स्पर्धेत अनेक बाल कलाकारांनी एकाहून एक सुंदर अशा मातीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
बाल कलाकारांनी मातीपासून घडविल्या गणेश मूर्ती पर्यावरण पूरक उत्सवाची गरजपर्यावरण पूरक उत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली आहे. गणेश उत्सव काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होऊन नैसर्गिक जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या किंवा शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना केल्यास पर्यावरण रक्षणाला आपण फार मोठा हातभार लावता येऊ शकतो. त्यामुळे घरोघरी आणि सार्वजनिक गणेश उत्सवातील गणेशाची मूर्ती देखील शाडूमातीची असायला हवी. गणपतीची मूर्ती पर्यावरण पूरक असल्यास ती विसर्जन केल्यानंतर तात्काळ विरघळते, शिवाया जल प्रदुषणाचाही धोका टळतो. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
पर्यावरणपूरक उत्सवाचा दिला संदेश नागरिकांनीही जागृत होणे आवश्यकदिवसेंदिवस होत असलेल्या निसर्गाच्या असंतुलनामुळे आज आपणास पर्यावरण विषयी अधिक जागृत होणे आवश्यक झाले आहे. येत्या गणेश उत्सव सुद्धा पर्यावरण पूरक असायला हवा कारण पर्यावरण पूरक गणेश उत्सव काळाची गरज आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची जनजागृती व्हावी या उद्देशाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे अमरावती विभाग अध्यक्ष प्रभाकर दिघेवार यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एकूण पन्नास मुला-मुलींनी भाग घेतला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे जिल्हा सचिव गजानन रासकर तालुका, अध्यक्ष राजेश माने, काशिनाथ कुबडे यांनी परिश्रम घेतले.