महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या भेटीत कापशी, बांभोरा पीएससीचा कारभार चव्हाट्यावर - yavatmal health news

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक दिली. यावेळी येथील कर्मचारी व अधिकारी मस्टरवर स्वाक्षरी करीत नसल्याचे उघडकीस आले.

yavatmal
yavatmal

By

Published : Feb 3, 2021, 6:32 PM IST

Updated : Feb 3, 2021, 6:45 PM IST

यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील कापशी (कोपरी) येथे 12 बालकांना पोलिओ डोस ऐवजी त्यांना सॅनिटायझर पाजण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक दिली. यावेळी येथील कर्मचारी व अधिकारी मस्टरवर स्वाक्षरी करीत नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे केंद्रावरील कारभार चव्हाट्यावर आला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमित दांडी

या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सहायक ए. एन. खंडारे, कनिष्ठ सहायक बी. टी. राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. मसराम आणि डॉ. महेश मनवर असे केंद्रावर मस्टरवर उपस्थिती आहे. मात्र डॉक्टर मसराम आणि डॉ. मनवर हे नियमित उपस्थित राहत नाहीत. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहारही केल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. एकूणच या पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी व पीएससीचा कारभार चव्हाट्यावर आला.

अंगणवाडी सेविका म्हणतात डॉक्टर मोबाईलवर

कापसी केंद्रावरील अंगणवाडी सेविकेला या घटनेबाबत विचारणा करण्यात आली असता पोलिओ डोस देण्यापूर्वी उपस्थित डॉक्टरांना दाखविला. मात्र, त्यांनी पोलिओ देण्याचे निर्देश दिले. यावेळी डॉक्टर मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले. तर भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी राहत नाहीत. वैद्यकीय अधिकारी दांडी मारत असल्याचे समोर आले. त्यामुळे एकूणच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन वेळ पडल्यास निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांनी सांगितले.

Last Updated : Feb 3, 2021, 6:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details