महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुबईवरुन यवतमाळमध्ये आलेल्या 'त्या' 9 जणांना आयसोलेशन वार्डमध्ये हलवले

3 कुटूंबातील 9 रुग्णांना त्यांच्या घरात वैद्यकीय निगराणीत ठेवण्यात आले होते. मात्र, यातील एकाची वैद्यकीय चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्या सर्वांना यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

Dubai Returnee 9 patient admited in Isolation ward in Yavatmal
दुबईवरुन यवतमाळमध्ये आलेल्या 'त्या' 9 जणांना आयसोलेशन वार्डमध्ये हलवले

By

Published : Mar 13, 2020, 2:11 AM IST

यवतमाळ - दुबई वरून आलेले यवतमाळ येथील 3 कुटूंबातील 9 रुग्णांना त्यांच्या घरात वैद्यकीय निगराणीत ठेवण्यात आले होते. मात्र, यातील एकाची वैद्यकीय चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्या सर्वांना यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहेत.

दुबईवरुन यवतमाळमध्ये आलेल्या 'त्या' 9 जणांना आयसोलेशन वार्डमध्ये हलवले

त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे पाठविण्यात आले आहे. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या पुढील निर्देशानुसार उपचार केले जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितली.

हेही वाचा -पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबत यवतमाळमधील दहा जणांचा दुबई ते मुंबई प्रवास

साधारण 9 ते 10 दिवस त्याच्यावर आयसोलेश वार्ड मध्ये उपचार केले जाणार आहेत. तसेच कोरोनाच्या भीतीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन सुद्धा पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली.

हेही वाचा -'कोरोना'मुळे आरोग्य यंत्रणा 'अलर्ट', यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details