महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. अशोक उईके यांचे हस्ते कामगारांना सुरक्षा किटचे वाटप - 500 कामगार

इमारत व इतर कामगारांना सुरक्षा किटचा लाभ मिळावा. या उद्देशाने राळेगाव विधासभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या विविध गावात कामगारांची नोंदणी करण्यात आली. सुरक्षा किटचा लाभ मिळावा म्हणून कामगारांनी उमरीच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठी गर्दी केली होती.

डॉ. अशोक उईके यांचे हस्ते कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

By

Published : Jul 28, 2019, 11:27 PM IST

यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील उमरी ग्रामपंचायत कार्यालयात शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके होते. यावेळी उईकेंच्या हस्ते कामगारांना किटचे वाटप करण्यात आले.

डॉ. अशोक उईके यांचे हस्ते कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

इमारत व इतर कामगारांना सुरक्षा किटचा लाभ मिळावा. या उद्देशाने राळेगाव विधासभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या विविध गावात कामगारांची नोंदणी करण्यात आली. सुरक्षा किटचा लाभ मिळावा म्हणून कामगारांनी उमरीच्या ग्रामपंचाय मध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी जवळपास ५०० कामगारांना किटचे वाटप करण्यात आले.

आज सकाळी पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. ज्या कामगारांना नोंदणीसाठी अडचणी येत होत्या. त्यांना स्वतः मार्गदर्शन करून त्यांची ऑनलाइन नोंदणी करून दिली. त्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचेसह केळापूरचे तहसीलदार सुरेश कवाळे, बांधकाम मंडळाचे पी. एन. कांबळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष शंकर समृतवार, उमरीचे सरपंच वसंत राठोड, महादेव ठाकरे, अक्कलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details