महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ : मृत्यू-दर कमी करण्यासाठी गांभीर्याने टेस्टिंग करा - जिल्हाधिकारी - यवतमाळ कोरोना बातमी

यवतमाळ जिल्ह्यात दररोज साडे चारशेवर पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. तर रोज आठ ते दहा पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू होत आहे. 45 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करुन घ्यावे व सर्व नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण

By

Published : Apr 11, 2021, 4:11 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्चच्या तुलनेत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मृत्यूचा आकडा चार पटीने वाढला आहे. तर दररोज साडे चारशेवर पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. रोज आठ ते दहा पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, मास्कचा नियमित वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे, तसेच अनावश्यक बाहेर फिरू नये, अश्या सर्व नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

जिल्हाधिकारी अमोल येगडे
45 वर्षावरील नागरिकांनी लस घ्यावीजिल्ह्यात एक एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरीकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाही. त्यामुळे या नागरिकांनी स्वतः पुढे येउन लसीकरण करून घ्यावे. ज्या नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे, त्यांनी स्वतः कोरोना नियमांचे पालन करावे. कोरोनाचे लवकर निदान झालं तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी व शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details