यवतमाळ - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री संजय देशमुख यांनी केली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परिवर्तन संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करा - माजी मंत्री संजय देशमुख - Collector Yavatmal Sanjay Deshmukh News
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री संजय देशमुख यांनी केली आहे.
संजय देशमुख यानी पत्रकार परिषदेत विमा कंपन्यांचे कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी बसत नाही. शेतकरी ऑनलाईन अर्ज भरतील तर शेतात कधी जातील, असे प्रश्न उपस्थित केले. सरकारने कापूस खरेदीचे धोरण बदलले पाहिजे, अशी मागणीही देशमुख यांनी केली. त्याचबरोबर, दिग्रस मतदारसंघात विजयी झाल्यानंतर संजय राठोड यांनी मिरवणुकीत हातवारे करीत जणू काही वेगळाच इशारा दिला. या स्टाईलचा भाजपचे बंडखोर पराभूत उमेदवार तथा माजी मंत्री संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत निषेध नोंदवला. संजय राठोड यांनी मिरवणुकीत जे हातवारे केले, ते मला जे काही ७५ हजार मत मिळालीत त्या मतदारांना धमकवण्यासाठी ते करण्यात आल्याचे सांगत देशमुख यांनी संजय राठोड यांचा निषेध केला.
हेही वाचा-विद्युत स्पर्श होऊन ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू