यवतमाळ -पुसद येथील एका रुग्णाने आयसोलेशन वार्डात रुग्णाला योग्य सुविधा मिळत नसल्याचे प्रकरण नुकतेच समोर आणले होते. या प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली असून याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली.
वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची जिल्हा प्रशासनाकडून दखल; त्रिपक्षीय समितीची स्थापना
जिल्हा प्रशासनातील प्रत्येक अधिकारी तसेच आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त करून घरी पाठविणे, हे एकच ध्येय आहे. तरीसुध्दा काही रुग्णांच्या येथील व्यवस्थेबाबत तक्रारी असेल तर प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे आमदार उईके यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनातील प्रत्येक अधिकारी तसेच आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात भरती होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त करून घरी पाठविणे, हे एकच ध्येय आहे. तरीसुध्दा काही रुग्णांच्या येथील व्यवस्थेबाबत तक्रारी असेल तर प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल. तसेच रुग्णांशी असभ्य वागणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिला.
येथील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी नि:स्पक्ष त्रिपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ असून इतरही खासगी डॉक्टरांचा यात समावेश करण्यात आला आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उईके यांनी सांगितले.