यवतमाळ - जिल्ह्यातील ७ मतदार संघातील २४९९ मतदान केंद्रावर वर रविवारी सकाळपासून पोलींग पार्टी रवाना झाल्या आहेत. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ७ मतदारसंघातून वनी, राळेगाव, यवतमाळ, आर्णी, पुसद, उमरखेड आणि दिग्रस मतदारसंघातील केंद्रावर १५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
यवतमाळमध्ये मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; पोलिसांचा चोख बंदोबस्त हेही वाचा -महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट
मतदारसंघांमध्ये ७ उपविभागीय पोलिस अधिकारी, २४ पोलीस निरीक्षक, ८३ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, १७३७ पोलीस कर्मचारी, ११०१ होमगार्ड यांसह ४४६० पोलिसांचा तगडा बंदोबस्त मतदान केंद्रांवर लावण्यात आला आहे. या केंद्रांवर जिल्ह्यातील २१ लाख ७५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
हेही वाचा -'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन