यवतमाळ - महिलांचा आनंदाचा सण मकर संक्रांत संक्रांतीच्या निमित्ताने महिला विविध प्रकारच्या वस्तू बाजारातून आणून एकमेकींना भेट स्वरुपात देतात. याचप्रकारे एका पाचव्या पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने तिच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात ( Haldi Kunku Occasion ) घरी आलेल्या महिलांना वाणामध्ये पक्ष्यांसाठी पाणी पात्र वाटप करून इतर महिलासोमर एक आदर्श ठेवला. ( Distribution of water containers for birds ) काश्यापी विनोद दोंदल (वय-11) असे या मुलीचे नाव आहे.
मकर संक्रांत म्हणजे वातावरणातील बदल. सूर्य तीळतीळ वाढत जातो, म्हणजेच हिवाळा संपून उन्हाळाची चाहूल लागते. रखरखत्या उन्हात पशुपक्ष्यांचे पाण्यावाचून खूप हाल होतात. काही पक्षी पाण्यावाचून दगावतात. पशुपक्ष्यांना वाचवले पाहिजे म्हणून काही तरी प्रयत्न केले पाहिजे, हे ध्यानात ठेवून काश्यापीने आपल्या घरी होत असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आपल्या घरी आलेल्या महिलांना वाणात पक्षासाठी पाणी पात्र वाटप केले.