यवतमाळ -दिग्रस नगरपरिषदमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने विषप्राशन करून काल (बुधवारी) आत्महत्या केली. या कर्मचाऱ्याचे आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात त्याने शिवसेनेची महिला पदाधिकारी संजय राठोड याचे नाव सांगत ब्लॅकमेलींग करत असल्याचे सांगितले आहे. या घटनेने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळपासून मृतकांची नातेवाईकांनी दिग्रस पोलीस ठाण्यात धडक देऊन आरोपी महिला हिला अटक करण्यासाठी दोन तास ठिय्या आंदोलन केले.
दिग्रस नगरपरिषद कर्मचाऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या
व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल
दिग्रस येथील नगरपरिषदमध्ये काम करणाऱ्या अनिल अशोक उबाळे याने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शूट केला. तो समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यात त्याने दिग्रस येथील शिवसेनेच्या महिला उपशहर प्रमुख अर्चना अरविंद राठोड ही वारंवार मानसिक, आर्थिक त्रास देत आहे. माजी मंत्री संजय राठोड यांच्या नावाने धमकावत माझ्याकडून पैशाची मागणी करत आहे, असा आरोप व्हिडिओतून करण्यात आला आहे. या व्हिडिओने जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतक अनिलवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याचे नातेवाईक पोलीस ठाण्यावर धडकले. त्यानी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यासाठी जवळपास दोन तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. मृतक अनिलच्या दोन ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाले आहे. त्यात पहिल्या क्लिपमध्ये तो त्याच्या आईला मी आता विषप्राशन केला, मला न्याय पाहिजे. तिला अटक झाली पाहिजे, अशी मागणी तो करत होता. तर दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये तो शिल्पा खंडारे नामक नातेवाईक महिलेशी संवाद साधतो आणि मी आत्महत्या करतोय, मी त्या महिलेमुळे खूप डिप्रेशनमध्ये आहे. या प्रकरणी मृत अनिलच्या पत्नीच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी अर्चना अरविंद राठोड हिच्या विरुद्ध 306 व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्या महिलेला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
'तिचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही'
महिला ही शिवसेनेची पदाधिकारी असल्याचे अनिलने आपल्या व्हिडिओत सांगितले. मात्र, महिलेचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. ती कुठलीही पदाधिकारी नाही. ती फक्त एक महिन्या आधी सामाजिक कार्यक्रममध्ये स्वतःहून हजर झाली होती. ती संजय राठोड यांना भेटायला आली होती. आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही. सदस्य ही नाही. तिच्यावर योग्य ती कारवाई करावी, असा खुलासा शिवसेनेच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी शेरे यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस तक्रारीत महिला शिवसेनेची पदाधिकारी असल्याचा उल्लेख करण्यात आले आहे. ती त्याच आधारावर अनिलला ब्लॅकमेल करत होती. तिचे नेमके काय संबंध होते? हे पोलीस तपासानंतर पुढे येईल, असे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -पोलीस शिपायाचा सुपारी देऊन खून; महिला पोलिसासह दोघे गजाआड