यवतमाळ- पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक संघटना आणि नागरिकांनी भाग घेऊन झाडांचे काळजीपूर्वक संवर्धन करावे, असे प्रतिपादन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. यावेळी जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, वॉटर कप याचा आढावाही आयुक्तांनी घेतला.
जिल्ह्याला १ लाख ३७ हजार ११ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वन विभागासोबतच इतर शासकीय यंत्रणांनी यात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. इतर विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी पुढील ७ दिवसात जागा निश्चित करून खड्डे खोदण्यास सुरवात करावी. तसेच याची माहिती नियमितपणे पोर्टलवर अपलोड करावी. या बाबींचा विभागीय स्तरावर नियमित आढावा घेतला जाणार आहे. वृक्ष लागवडीनंतर वृक्ष जगविणे हेसुध्दा आपले काम आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्य ठेवा.
औद्योगिक विकास महामंडळांतर्गत असलेल्या प्रत्येक उद्योगामध्ये ३३ टक्के वृक्षांची लागवड होणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा उद्योग केंद्राने नियोजन करावे. तसेच आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची हरीत सेनेमध्ये नाव नोंदणी करावी. वृक्षलागवड मोहिमेकरीता लागणारी रोपे सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने उपलब्ध करुन द्यावी, अशा सुचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या.
१ लाख ३८ हजार ६८ रोपांची निर्मिती