यवतमाळ - सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठलाही पंचनामा न करता जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी घेऊन आज यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी खात्यात जमा झाली पाहिजे, अन्यथा पालकमंत्री संदिपन भुमरे यांना दिवाळी साजरी करू देणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
'कुठलही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही'
राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेत आहे. मात्र, आता शेतकऱ्यांना जाणीव झाली आहे कुठल्याही पक्षाचे सरकार असो हे शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. केवळ शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सोंग हे सत्ताधारी पक्षाचे नेते करत आहेत. खर्या अर्थाने सत्ताधारी हे शेतकऱ्यांचे भूमिपुत्र असाल आणि शेतकऱ्यांची मुलं म्हणून निवडून गेलेले आहात. तरर नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.