महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू; 59 जण नव्याने पॉझिटिव्ह - यवतमाळ नवीन 59 कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात सद्यस्थितीत 530 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9523 झाली आहे. आज (दि.19) 39 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8544 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 305 कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे.

death of two corona victims and 59 newly positive patient in yavatmal district
यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

By

Published : Oct 19, 2020, 8:10 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर 59 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृतांमध्ये यवतमाळ शहरातील 60 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 381 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 59 नव्याने पॉझिटिव्ह तर 322 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 530 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9523 झाली आहे. आज (दि.19) 39 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8544 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 305 कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details