यवतमाळ- वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण करण्याकरिता शेताच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात आला होता. त्या जिवंत तारेला 18 वर्षीय तरुणीचा स्पर्श झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. रमई परस्ते (वय 18) असे मृत तरुणीचे नाव असून ती मध्यप्रदेशातील खमरिया या गावाची रहिवासी आहे.
शेतातील विद्युत तारेच्या स्पर्शाने तरुणीचा मृत्यू; वणी तालुक्यातील घटना - wani police station
वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण करण्याकरिता शेताच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात आला होता. त्या जिवंत तारेला 18 वर्षीय तरुणीचा स्पर्श झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. रमई परस्ते (वय 18) असे मृत तरुणीचे नाव असून ती मध्यप्रदेशातील खमरिया या गावाची रहिवासी आहे.
मजुरीसाठी आली होती वणीत
तालुक्यातील शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी इतर राज्यातून मजूर बोलावतात. दोन महिन्यापूर्वी मजुरीच्या कामाकरिता कुमारी ही आपल्या परिवारासह बोर्डा येथे आली होती. शेतकरी मोठ्या कष्टाने शेतात उत्पादन घेतात. मात्र वन्यप्राणी शेतात शिरून पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. त्यामुळे शेत पिकाचे संरक्षण व्हावे याकरिता काही शेतकरी शेताच्या कुंपणाला विद्युत करंट लावतात. बोर्डा येथील शेतकरी नितीन ढेंगळे या शेतकऱ्याने वन्य प्राण्यापासून संरक्षण मिळावे याकरिता शेताच्या कुंपणाला रात्रीच्या वेळी विद्युत करंट लावला होता. पहाटे 5.30 वाजताचे सुमारास कुमारी ही प्रातः विधीकरिता ढेंगळे यांच्या शेताकडे गेली होती. वीज प्रवाहित असलेल्या कुंपणाच्या तारेला स्पर्श होताच तिला जबर झटका बसला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही बाब सकाळी उघड होताच शेतमालक नितीन ढेंगळे यांनी वणी पोलिसांना माहिती दिली असून पुढील कारवाई सुरू आहे.