यवतमाळ -नांदेपेरा मार्गावरील रेल्वे रूळाजवळ असलेल्या झुडूपात तरूणाता मृतदेह आढळून आला. मृत तरूण हा मारेगावचा असून तो वाहन परवाना काढण्यासाठी वणी येथे आल्यानंतर बेपत्ता होता. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली.
योगेश रामभाऊ गहुकर (28, रा. मारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. योगेशचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृत योगेश मारेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिकवण्याचे काम करत होता. योगेशने शुक्रवारी वणी येथे वाहन परवाना काढण्यासाठी जात असल्याचे घरी सांगितले होते. योगेश उशीरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याचा तपास न लागल्याने अखेर मारेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.