यवतमाळ : पुसद शहरातील पुस नदीपात्रात आढळला 72 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह - पुस नदीपात्रात आढळला मृतदेह
पुसद शहरातील पुस नदीपात्रात एका 72 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आज दुपारी आढळून आला. मुकुंद खंदारे असे मृतकाचे नाव आहे.
यवतमाळ : पुसद शहरातील पुस नदीपात्रात आढळला 72 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह
यवतमाळ - पुसद शहरातील पुस नदीपात्रात एका 72 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आज दुपारी आढळून आला. मुकुंद खंदारे असे मृतकाचे नाव असून तो पुसदपासून 5 किमी अंतरावर असलेल्या वालतूर येथील रहिवासी आहे. मृतक हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान, आज दुपारी काही नागरिकांना पूस नदीपात्रात एका पुरुषाचे मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यावरून नागरिकांनी लगेच पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.