यवतमाळ - आर्णी शहरातील प्रभाग दोनमध्ये राहणाऱ्या भाजीविक्रेता 58 वर्षीय महिलेला राहत्या घरातून रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू ( vegetable seller woman died ) झाला. नुकतीच त्याच घरासमोरील एका घरातून रिव्हॉल्व्हर व सात जिवंत काडतूस चोरीस गेले आहेत. यामुळे या घटनेकडे पोलीस संशयाने पाहत आहेत. महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप सष्ट झाले नसले तरी पोलिसांनी त्या महिलेच्या सुनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आर्णीत भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू, चौकशीसाठी सुनेला पोलिसांनी घेतले ताब्यात
आर्णी शहरात एका भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू ( vegetable seller woman died ) झाला. दरम्यान, त्या घरासमोरील एका घरातून रिव्हॉल्व्हर व सात जिवंत काडतूस चोरीला गेले आहे. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचे कयास पोलिसांकडून लावण्यात येत आहे. महिलेच्या मृत्यू प्रकरणी महिलेच्या सूनेस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आशाबाई किसनराव पोरजवार, असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेस दोन मुले व दोन विवाहित मुली आहे. मोठा मुलगा अरविंद ( वय 35 वर्षे) विवाहित असून, सून सरोज ( वय 28 वर्षे ) आहे. तसेच लहान मुलगा मंगेश ( वय 28 वर्षे) आहे. मृत महिला व मोठा मुलगा अरविंद दोघे भाजीपाला व्यवसाय करत होते. घटनेच्या वेळी अरविंद व एक हमाल घराबाहेर भाजीपाला विक्रीसाठी जाण्याची तयारी करत होते. मृत महिला व सून घरात होते. आशाबाई पडल्याच समजताच सगळे घरात धावले असता रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे आढळून आले. तोंडातून व कानातून प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून येताच शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेले व यवतमाळला हलविले. या प्रकरणी सुनेला आर्णी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्यासह ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ज्ञ व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू आहे.