महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ : तोतया नायब तहसिलदारांचा सराफा व्यावसायिकाला गंडा - यवतमाळ गुन्हेवृत्त

नायब तहसीलदार म्हणून आलेल्या एका तोतया व्यक्तीने शहरातील सराफा व्यावसायिकाला गंडा घालत तीन ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान महागाव शहरातील सराफा लाईनमध्ये गोविंदराज ज्वेलर्स येथे घडली.

fake deputy tehsildar was robbed Jeweler shop
fake deputy tehsildar was robbed Jeweler shop

By

Published : Mar 20, 2021, 7:35 PM IST

Updated : Mar 20, 2021, 7:43 PM IST

यवतमाळ - नायब तहसीलदार म्हणून आलेल्या एका तोतया व्यक्तीने शहरातील सराफा व्यावसायिकाला गंडा घालत तीन ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान महागाव शहरातील सराफा लाईनमध्ये गोविंदराज ज्वेलर्स येथे घडली.

राजपत्रित अधिकारी असल्याची बतावणी -

संचालक चंद्रशेखर लाभशेटवार हे दुकानात असताना एक व्यक्ती दुकानात आला व आपण नायब तहसिलदार असल्याची बतावणी करून लाभशेटवार यांच्याकडे सोन्याच्या भावाची विचारणा केली. एक ग्रामचे सोन्याचे मंगळसुत्र व दोन ग्राम कानातील फुले असे दागिने खरेदी केली त्यानंतर लाभशेटवार बिल बनवीत असताना ग्राहक बनून आलेला तोतया तहसीलदार दुकानातून पसार झाला. तेव्हा सराफा व्यावसायिकाने दुकानाच्या बाहेर येऊन पाहणी केली. त्याचा कुठेच मागमूसही न लागल्याने शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सराफा व्यवसायिकाने महागाव पोलिसात तक्रार दिली.

सराफा व्यावसायिक
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी -
महागाव पोलिसांनी सराफा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये तोतया नायब तहसिलदार कैद झाला आहे. तहसीलदार नामदेव इजालकर यांचेकडून माहिती जाणून घेतली असता कुणीच नवीन नायब तहसीलदार रुजू झाले नसल्याचे पोलिसांना सांगितले. याच तोतया नायब तहसिलदाराने शहरातील नामांकित कापड दुकानातील महागड्या साड्या घरी दाखवून आणतो म्हणून साड्या घेवून पोबारा केल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास महागाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु करीत आहेत.
Last Updated : Mar 20, 2021, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details