महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महागाव, दारव्हा तालुक्यात गारपीट; हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला - यवतमाळच्या बातम्या

महागाव, दारव्हा, पुसद, बाभूळगाव, यवतमाळ तालुक्यात गारपीट आणि पाऊस झाल्याने गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकरी
शेतकरी

By

Published : Feb 20, 2021, 6:51 PM IST

यवतमाळ - शेतकऱ्यांमागे अस्मानी आणि सुलतानी संकटाची मालिका सुरूच आहे. एकही हंगाम शेतकऱ्यांना साथ देताना दिसत नाही. अवकाळी पावसाने काल दुपारी आणि रात्री जिल्ह्यात हजेरी लावली. महागाव, दारव्हा, पुसद, बाभूळगाव, यवतमाळ तालुक्यात गारपीट आणि पाऊस झाल्याने गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. आणखी आकाशात काळे ढग दाटून आहे. त्यामुळे वादळी पाऊस येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

शेतकरी
गहू, हरभरा पिकांचे नुकसान-
जिल्ह्यात खरीप हंगामात साडेनऊ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. यात कपाशी, सोयाबीन, तूर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तर रब्बी हंगामात यंदा पाऊने दोन लाख हेक्टरवर लागवड करण्यात आली. यात गहू, हरभरा, भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. लागवड खर्च निघू शकला नाही. या धक्क्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात घाम गाळला. खरीप हंगामातील नुकसान या हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, अवकाळी पावसाच्या गारपिटीने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटले. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकरी

ABOUT THE AUTHOR

...view details